रील्स बनवण्याच्या नादात तिघांचा मृत्यू

| राजस्थान | वृत्तसंस्था |

राजस्थानमधील प्रसिद्ध हनुमानगड जिल्ह्यात एक अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. एक भरधाव कार कालव्यात पडल्याने वडील, मुलगा आणि नातवाचा मृत्यू झाला आहे.

राठीखेडा येथील इमाम मरगूब आलम हे रहिवासी आपल्या मुलाला कार चालवण्यास शिकवत होते, त्यांच्यासोबत पाच वर्षाचा नातूही होता. दरम्यान कारवरील अचानक नियंत्रण सुटल्याने ती रस्त्याकडील असलेल्या कालव्यात पडली. अपघातात कारच्या खिडकीच्या काचा उघडू न शकल्याने तिंघाचाही कारमध्ये गुदमरल्याने मृत्यू झाल्याचे मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सर्वांच्या अथक प्रयत्नानंतर तिंघाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि तात्काळ शवविच्छेदनासाठी पाठवले. या दुर्देवी घटनेनंतर संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

हनुमानगड जिल्ह्यातील राठीखेडा येथील (60) वर्षीय मरगूब आलम आणि सानिब हुसेन आणि ५ वर्षीय हसनैन अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांचे पथक आणि एसडीआरएफ टीम तसेच स्थानिकांच्या मदतीने सुमारे तीन तासापेक्षा जास्त प्रयत्नानंतर तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मिडिया रिपोर्टनुसार, स्थानिकांनी पोलिसांना सांगितले की, ड्रायव्हरच्या सीटवर बसलेल्या व्यक्ती त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ बनवत होता, त्यानंतर अचानक कार रस्त्याकडील कालव्यात पडली.

Exit mobile version