खासगी शाळेत तीन विद्यार्थिनींचा विनयभंग

। मुंबई । प्रतिनिधी ।

तीन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना भांडुप परिसरातील एका खासगी शाळेत घडली. याप्रकरणी मुलींच्या पालकांनी केलेल्या तक्रारीवरून भांडुप पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

भांडुप पश्चिम परिसरातील एका खासगी शाळेत बुधवारी ही घटना घडली. शाळेच्या इमारतीमधील उद्वाहन नादुरुस्त झाले होते. ते दुरुस्त करण्यासाठी याठिकाणी दोन कर्मचारी आले होते. यापैकी गोपाल गौडा (27) याने 10 वर्षांच्या दोन आणि 12 वर्षांची एक अशा तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केला. मुलींनी पालकांना याबाबत सांगितले. त्यानंतर पालकांनी भांडुप पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली असता पोलिसांनी आरोपी गोपाल गौडा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

Exit mobile version