मुंबई-पुणे महामार्गावरील टँकर अपघातात तिघांचा मृत्यू

। अलिबाग । प्रतिनिधी ।
महामार्गांवर सातत्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. वाहनचालकांचा बेजबाबदारपणा, भरधाव वेगाने चालवली जाणारी वाहने यासारख्या गोष्टींमुळे अपघात होत आहेत. त्यातच सोमवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर प्रोपोलिन गॅस टँकर उलटल्याची घटना घडली.

अपघातग्रस्त टँकर एका लेनवरून दुसऱ्या लेनवर आल्याने समोरच्या वाहनांना धडक बसली. या अपघातात तीनजणांचा मृत्य झाला आहे. सुदैवाने गॅस लिकेज झाला नाही. परंतु, टँकर पलटल्याने उभे करण्याचे प्रयत्न अजून सुरु आहेत. हा टँकर उलटल्याने जवळपास ३९.२०० मैल ट्रॅफिक थांबवली.

प्रोविजन म्हणून खोपोली फायर ब्रिगेडची टीम त्या ठिकाणी पाण्याचा मारा करण्यासाठी सज्ज झाली असून विजय भोसले, दिनेश ओसवाल, निलेश कुदळे धनंजय गीध, बोरघाट पोलीस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल हे सर्व घटनास्थळी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था घटनास्थळी मदत कार्यात व्यस्त आहेत. तर, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू आहे.प्रोविजन म्हणून खोपोली फायर ब्रिगेडची टीम त्या ठिकाणी पाण्याचा मारा करण्यासाठी सज्ज झाली असून विजय भोसले, दिनेश ओसवाल, निलेश कुदळे धनंजय गीध, बोरघाट पोलीस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल हे सर्व घटनास्थळी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था घटनास्थळी मदत कार्यात व्यस्त आहेत. तर, खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू आहे.

Exit mobile version