त्रिकुट पर्वतावरील अपघातात तीन जणांचा मृत्यू

अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी केले ४५ तासांचे बचावकार्य
। झारखंड । वृत्तसंस्था ।

झारखंडमधील देवघर येथील त्रिकुट पर्वतावर रोपवेमध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी चालू असलेलं रेस्क्यू ऑपरेशन आता संपले आहे. साधारणपणे ४५ तास चाललेल्या या प्रयत्नांनतर हवेत अधांतरी अडकलेल्या लोकांना वाचवण्यात यश आले परंतु, या दुर्घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून ५० हून अधिक लोकांना घेऊन जाणारे सहापेक्षाही अधिक डबे हवेतच अडकले.

Exit mobile version