तीन लाख युक्रेनियन लोकांनी देश सोडला

। युक्रेन । वृत्तसंस्था ।
युद्धग्रस्त युक्रेनमधील नागरिकांच्या स्थितीबाबत भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये चिंता व्यक्त केली. अजूनही युक्रेनवर रशियाचे हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेन पूर्णतः कोसळून गेला. रशिया युक्रेन युद्धाने साऱ्या जगाची चिंता वाढवली आहे. रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये जवळपास ६.५ दशलक्ष लोक विस्थापित झाले असून एकूण ३.२ दशलक्ष लोकांनी आधीच देश सोडला आहे. यू.एन. स्थलांतर एजन्सीच्या अंदाजानुसार रशियाच्या आक्रमणामुळे युक्रेनमध्ये जवळपास ६.५ दशलक्ष लोक विस्थापित झाले आहेत तर ३.२ दशलक्ष आधीच देश सोडून पळून गेले आहेत. या युद्धामुळे युक्रेनचे जनजीवन पुर्णपणे विस्कटले असून मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे.

Exit mobile version