। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल परिसरातून तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून मोटारसायकलींची चोरी झाल्याची घटना घडल्याने वाहन मालकांमध्ये भीतीयुक्त वातावरण आहे. पनवेल येथील रेल्वे स्टेशनबाहेरील रस्त्याच्या कडेला धीरज परदेशी यांनी त्यांची 25 हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची यामाहा एफ झेड मोटारसायकल क्र. एमएच 46 वाय 7578 ही उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.
तर, दुसर्या घटनेत संतोष वाघ याने दहा हजार रुपये किमतीची निळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर प्लस मोटारसायकल क्र. एमएच 06 एडी 6003 ही नवीन पनवेल सिग्नलजवळील ब्रिजच्या उजव्या बाजूच्या रस्त्यावर उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली. तसेच तिसर्या घटनेत प्रसाद पाटील यांची काळ्या रंगाची 15 हजार रुपये किमतीची होंडा युनिकॉर्न मोटारसायकल क्र. एमएच 06 एयु 0797 ही आश्रय सोसायटी, परदेशी आळी येथे उभी ठेवली असता अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याबाबतच्या तक्रारी पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.