अलिबाग तालुक्यात कोरोनाचे तीन नवे रूग्ण तर 12 कोरोना मुक्त

तहसीलदार कार्यालयाची माहिती
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात शुक्रवार दि. 10 मे रोजी कोरोनाच्या तीन नवीन रुग्णांची नोंद झाली असून 12 रूग्ण कोरोना मुक्त असल्याची माहिती अलिबाग तहसिलदार कार्यालयातून देण्यात आली आहे.
आतापर्यंत अलिबाग तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 23 हजार 285 झाली आहे. यापैकी 629 रुग्णांचा मृत्यू झाला. तर22 हजार 635 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 21 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

Exit mobile version