तीन नवीन पादाचरी पुलांची कामे सुरू

| नेरळ । वार्ताहर ।
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवरील कर्जत एंडकडील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात अनेक विकास कामे मुंबई रेल कॉर्पोरेशनकडून सुरू आहेत. सध्या नेरळ स्थानकात एक पादचारी पुल असून आणखी तीन नवीन पादचारी पुलांची कामे सुरू झाली आहेत. दरम्यान,नेरळ स्थानकातील एक पादचारी पुल हा पुढे स्काय वॉक म्हणून स्थानकाबाहेर जाणार आहे.स्थानकात आणखी तीन नवीन पादचारी पुल बांधले जात आहेत. त्यातील मुंबई दिशेकडील पादचारी पुलाचे काम वेगाने सुरू असून हा पुल दीड ते दोन महिन्यात प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. या पादचारी पुलांमुळे नेरळ रेल्वे स्थानकात रेल्वे मार्ग ओलांडून जाण्याची समस्या देखील दूर होऊ शकते आणि अपघाताचे प्रमाण देखील कमी होऊ शकतात. त्यामुळे भविष्यात नेरळ रेल्वे स्थानक हे पादचारी पुलांचे स्थानक म्हणून ओळजले जाऊ शकते.

Exit mobile version