खंडोबाची मूर्ती लंपास

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील साखर आक्षीमधील गणपती मंदिरातील खंडोबा देवाच्या तीन चांदीच्या मूर्ती लंपास करण्यात आल्या. कोळी समाजाचे कुलदैवत असलेल्या देवाच्या मूर्ती चोरीला गेल्याने नाराजीचे सूर उमटले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आक्षी साखर येथे गणपती मंदिर आहे. या मंदिरामध्ये कोळी समाजाचे कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या चांदीच्या मूर्ती होत्या. 20 नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी मंदिरातील कुलदैवतांच्या तीन मूर्ती लंपास केल्या. 45 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version