| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
इंदूर मध्यप्रदेश येथे 19 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत पश्चिम भारत विभागीय क्लासिक राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग चॅम्पियन स्पर्धा पार पडली. यामध्ये महाराष्ट्राच्या संघातून रायगडचे 3 खेळाडू सहभागी झाले होते. सब ज्युनिअर, ज्युनिअर आणि सिनिअर स्पर्धा झाली. यामध्ये ज्युनिअर मुली मध्ये 43 किलो वजनी गटात सार्वजनिक व्यायाम शाळा, वाडगांव (अलिबाग) सुहानी गावडे हिने 167.5 किलो वजन स्कॉट, बेंचप्रेस आणि डेडलिफ्ट या प्रकारात उचलून 2 रा क्रमांक मिळवला आणि रौप्य पदक जिंकले. तर 47 किलो वजनी गटात रायगडची आंतरराष्ट्रीय खेळाडू अमृता माधुरी ज्ञानेश्वर भगत, पॉवर हाऊस क्लब खोपोली हिने 305 किलो वजन स्कॉट बेंचप्रेस आणि डेडलिफ्ट यामध्ये उचलून 2 रा क्रमांक मिळवला आणि रौप्य पदक जिंकले. तर मुलांच्या 83 किलो वजनी गटात पेणच्या संसारे फिटनेसच्या अथर्व ज्योती मुकेश लोधी याने सुद्धा 642.5 किलो वजन स्कॉट बेंचप्रेस आणि डेडलिफ्ट या प्रकारात उचलून 2रा क्रमांक मिळवलाआणि रौप्य पदक जिंकले. या स्पर्धेत तिन्ही खेळाडू रौप्य पदकाचे पदकाचे मानकरी झाले. याबद्दल पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोशियन रायगडचे अध्यक्ष गिरीश शरद वेदक, कार्याध्यक्ष यशवंत मोकल, सहसचिव सचिन भालेराव, कार्यकारणी सदस्य सुभाष टेंबे, संदीप पाटकर, मानस कुंटे (अलिबाग), खजिनदार राहुल गजरमल ,सचिव अरुण पाटकर, उपाध्यक्ष सुभाष भाटे यांनी आनंद व्यक्त केला आहे आणि खेळाडूंच्या प्रशिक्षकांचेही अभिनंदन केले आहे.
पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत तीन रौप्यपदक
