रोहा, पेणमधील तीन विद्यार्थीनी चमकल्या

बॅचलर ऑफ डिझाईनच्या पदवी शिक्षणासाठी निवड

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अहमदाबाद येथील युनायटेड वर्ल्ड इन्स्टीट्युट ऑफ डिझाईन येथे बॅचलर ऑफ डिझाईनच्या पदवी अभ्यासक्रमासाठी तीन विद्यार्थीनींची निवड झाली आहे. देशभरातील 90 हजार विद्यार्थ्यांमधून रायगडमधील या तीन मुलींची निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत आहे.

तनवी सचिन पाटील व वेदिका दिपक पेडणेकर रा. पेण तसेच सिध्दी दिनेश पवार रा. रोहा असे या तीन विद्यार्थीनींची नावे आहेत. अहमदाबाद येथील युनायटेड वर्ल्ड इन्स्टीट्युट ऑफ डिझाईन शिक्षण संस्थेत 480 जागांसाठी देशभरातून सुमारे दीड लाख विद्यार्थीनी अर्ज केला होता. त्यात रायगड जिल्ह्यातील सात विद्यार्थ्यांचा समावेश होता. या प्रवेशासाठी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली. डिझायन संबंधित पुर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेत सहा विद्यार्थ्यांची निवड झाली. त्यानंतर डिझाईन संबंधित केलेले काम, वेगळा दृष्टीकोन याबाबतचे प्रात्यक्षिक सादरीकरण झाले. त्यानंतर मुलाकत झाली. या मुलाकतीमध्ये तन्वी पाटील, वेदिका पेडणेकर, आणि सिध्द पवार या तीन विद्यार्थींनीनी यश संपादन केले. या तिघींची निवड अहमदाबाद येथे युनाटेड वर्ल्ड इन्स्टीट्युट ऑफ डिझायन या संस्थेत झाली असून हा अभ्यासक्रम चार वर्षाचा आहे. डिझायनबाबत वेगवेगळ्या प्रकारचे धडे या चार वर्षात घेतले जाणार असल्याचे श्रेयस पाटील यांनी सांगितले.

या तिन्ही विद्यार्थीनी पेण येथील प्रायव्हेट हायस्कूल व राहटी येथील इंग्लीश स्कूलमधील असल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या या यशाबद्द त्यांचे सर्व स्तरातून कौतूक करण्यात येत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छादेखील वेगवेगळया स्तरातून देण्यात आल्या आहेत.

Exit mobile version