| आगरदांडा | प्रतिनिधी |
नागपूर रामटेक येथे स्पेशल ऑलिंपिक भारत महाराष्ट्र राज्यस्तरीय ॲथलेटिक्स आंतरशालेय स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील सुहित जीवन ट्रस्टच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. या स्पर्धेत राज्यातील 36 जिल्ह्यातील विविध संस्थांमधून निरनिराळ्या वयोगटांतील एकूण 320 विशेष खेळाडूंनी सहभाग नोंदविला होता. रायगडमधील मनीष म्हात्रे याने या स्पर्धेतील 18 वर्षांवरील वयोगटात उल्लेखनीय कामगिरी करत 200 मीटर धावणे सुवर्णपदक, अर्जुन वारे याने 14 ते 18 वयोगटात 200 मीटर धावणे रौप्य पदक तसेच सिद्धीका पाटील हिने 6 ते 12 वयोगटात 50 मीटर धावणे, यामध्ये सुवर्णपदक पटकाविले. त्याच्या या कामगिरीमुळे महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक, हरियाणा येथे होणार असलेल्या राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक्स स्पर्धांसाठी निवड झालेली आहे.







