| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईच्या गोवंडीत शनिवारी झालेल्या अपघातात एका डंपरने तीन तरुणांना चिरडले आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात डंपरखाली आलेल्या तिघांचाही जागेवरच मृत्यू झाला आहे. गोंवडी येथील शिवाजीनगर येथील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर हा अपघात झाला आहे. अपघातातील आरोपी डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अपघातानंतर संतप्त जमावाने रस्ता अडवून धरला होता. त्यामुळे या ठिकाणी काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावं लागलं. पोलिसांनी जमावावर सौम्य लाठीमार केला आहे.






