| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
विश्वचषक स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याचा थरार वाढवण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज झाले आहे. भारतीय हवाई दलाचे सूर्यकिरण विमाने चित्तथरारक प्रात्यक्षिक सामना सुरु होण्यापूर्वी दाखवणार आहे.
भारतीय हवाई दलाने सूर्यकिरण टिम चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर करणार असल्याची घोषणा केली आहे. हवाईदलाच्या गुजरातमधील जनसंपर्क अधिकाऱ्याने यासंदर्भात माहिती दिली. सूर्यकिरण टीम नऊ जेट विमानाद्वारे हवाई कसरती करणार आहे. यामुळे सामना सुरु होण्यापूर्वी हवाई दलाच्या चित्तथरारक कसरतींचा आनंद क्रिकेटप्रेमींना मिळणार आहे.