। खारेपाट । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील टाकादेवी क्रिडामंडळ मांडवा यांच्या विद्यमाने नारळीपौर्णिमेच्या दिवशी गुरुवार दि. 11 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय भव्य कुस्तीस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टाकादेवी स्पोर्टस् क्लब व मांडवा ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी ठिक 2.30 वाजता भव्य कुस्ती स्पर्धेचे मांडवा बंदर येथे शुभारंभ होईल. या भव्य कुस्ती स्पर्धेचा थरार होणार असून जिल्ह्यासह राज्यभरातून कुस्ती पेहलवानाचा सामना रंगणार आहे.
सदर स्पर्धेकरीता तालुका, जिल्हा, राज्यातून नामवंत आखाड्यातील पेहेलवान व कुस्तीप्रेमी उपस्थित राहणार आहेत. सदर कुस्ती स्पर्धेकरीता कुस्तीप्रेमींनी उपस्थित राहून स्पर्धेची आनंद घ्यावा . तसेच मांडवा येथील भव्य कुस्तली स्पर्धांची परंपरा गेल्या 100 वर्षांहून अधिक काळ सातत्याने होत असून गेल्या दोन वर्ष कोरोनामुळे खंड निर्माण झाला होता. मात्र यावर्षी भव्य अशा स्पर्धेचे आयोजन केले असून विविध स्पर्धक व विविध स्तरांतील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून तालुक्यातील सर्व क्रिडा प्रेमींनी या भव्य स्पर्धेचा याचा लाभ घ्यावा.