थरारक! खोपोली शिळफाट्यावर ब्रिजवर ट्रकला आग…पहा व्हिडिओ

खोपोली । वार्ताहर ।

खोपोली शहरातील शिळफाटा येथील इंदिरा चौकात आज सकाळी 6.45 च्या सुमारास पुण्याकडून मुंबई कडे जात असलेल्या तांदूळाने भरलेल्या ट्रक चा भीषण अपघात झाला, या भरधाव बेकाबू ट्रक ने दोन बाईकस्वारांना धडक दिली असून यात एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत तर अपघाता नंतर या ट्रक ने पेट घेतल्याने काही काळ या रस्त्यावरील रहदारी प्रभावित झाली होती. 

मिळालेल्या माहिती नुसार सकाळी 6.45 च्या दरम्यान एक तांदळाने भरलेला ट्रक पुण्याकडून मुंबई कडे जात असलेल्या ट्रक चे ब्रेक फेल झाला असावा त्यामुळे उतारावरून येताना हा ट्रक बेकाबू झाला होता.भरधाव येत असताना पुढे इंदिरा चौकात वाहनांची कायम मोठी गर्दी असते पण सकाळ असल्याने वाहतूक व गर्दी तुरळक होती. तरीही हा ट्रक इंदिरा चौकातील पाताळगंगा नदीवरील पूलावरून जात असताना समोरून दोन बाइक येत होत्या त्या दोन ही बाईकना या ट्रक ने जोरदार ठोकर दिली व पुढे जाऊन तो ट्रक पूलाच्या काठड्याला धडकुन थांबला.

या ट्रक ने ज्या बाईकना धडक दिली होती या बाइक वरील तीन जण गंभीर जखमी झाले होते त्यांना नागरिकांनी तात्काळ न पा हॉस्पिटल मध्ये दाखल केले उपचारा दरम्यान यातील एम जण मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर दोन जण गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू केले.

अपघातग्रस्त ट्रक नदीच्या पूलाला धडकल्या नंतर त्यातील तांदूळ रस्त्यावर सांडला होता व त्या त्राक ने अचानक पेट घेतला या वेळी घटनेची माहिती मिळताच आजूबाजूचे नागरिक मदतीला धावले,काही वेळातच खोपोली पोलिस तेथे पोहचले तर अपघातग्रसतांचे मदतीला ग्रुप चे अध्यक्ष गुरूंनाथ साठेलकर आपल्या टिम सह तेथे पोहचले व अपघातग्रसताना मदत केली. सादर ट्रक ने पेट घेतल्याने या मार्गावर वाहतूक थांबवण्यात आली होती व दुसर्‍या मार्गे वाहनांना सोडण्यात आले. 

खोपोली शिलफाट्यावर भरधाव ट्रक चा भीषण अपघात,१२ वर्षापूर्वीच्या आठवणी झाल्या.अपघात सकाळी झाल्याने या चौकात वाहतूक व नागरिकांची वर्दळ कमी होती म्हणून मोठा अपघात होण्याचा अनर्थ टळला.

Exit mobile version