महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने चालकांचा प्रश्न मार्गी

| उरण | प्रतिनिधी |

जीटीआय पोर्टमध्ये चारशे चालक मे. प्रिती लॉजिस्टीक्स, मे. मोरेश्वर ग्लोबल लॉजिस्टीक्स, मे. ज्योती ट्रान्सपोर्ट व मे. साई शक्ती पोर्ट सर्व्हिसेस या चार कंत्राटदारांमार्फत काम करत आहेत. या चालकांची पगारवाढीचा प्रश्न मागील दोन वर्षांपासून प्रलंबित होता. जीटीआय कंपनीच्या आडमुठ्या धोरणामुळे मार्ग निघत नव्हता परंतु कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्व कौशल्याने चारही कंत्राटदार व जीटीआयचे राजेश सिंग यांच्या बरोबर यशस्वी चर्चा करून ड्रायव्हर्सना 5000 रुपये पगारवाढ देण्याचे मान्य करण्यात आले. तसा करार (दि.23) रोजी केंद्रीय कामगार आयुक्त यांच्या कार्यालयात करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना 8.33% बोनस, 3 लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी, किमान 32 रजा, इन्सेन्टिव्ह व इतर सोई सुविधा देण्याचे मान्य करण्यात आले. या करारनाम्यानुसार कामगारांना जानेवारी 2023 पासूनचा पगारवाढीचा फरक मिळणार आहे.

Exit mobile version