। सिंधुदुर्ग । प्रतिनिधी ।
तालुक्यातील सोनवडे तर्फे कळसुली येथील घरातील दोन कर्ते भाऊ सुजल राणे व सचिन राणे यांचा राधानगरी येथे अपघाती मृत्यू झाला होता. दोन्ही मुले ही कुटुंबातील कर्ती असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तसेच, या मुलांचे वडील हे सतत आजारी असल्याने त्यांचा औषधोपराचा खर्च हे दोन्ही मुलं करत असत. त्यामुळे घरातील एकाच कुटुंबातील दोन्ही भाऊ गेल्याने त्यांची परिस्थिती हलाखीची बनली आहे. तरी त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी योजनेतून किंवा अन्य कोणत्याही योजनेतून तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी रुपेश पावसकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.