निवृत्ती वेतन मिळत नसल्याने उपासमारीची वेळ

शासनाचे लक्ष वेधण्यासाठी साखळी उपोषण
। माथेरान । वार्ताहर ।

आपल्याच हक्काचे पैसे सुध्दा वेळेत मिळत नसल्याने अनुसूचित जमातीच्या बाबतीत अत्यंत कठोरपणे वागणार्‍या निर्दयी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या लोकांना गांधीगिरी करून साखळी उपोषणाचे एकमेव शेवटचे हत्यार वापरून देखील घाम फुटत नाही.
एखाद्या दगडाला सुध्दा एकवेळ पाझर फुटला असता परंतु अनेक वर्षांपासून अनुसूचित जमातीच्या लोकांना दुय्यम वागणूक दिली जात आहे. त्यामुळे शासकीय सेवेत इमानेइतबारे सेवा करून सुध्दा शेवटच्या क्षणी पदरात पडणारे निवृत्तिवेतन मिळत नसल्यामुळे अनेकांना आता उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. अन्य समाजाच्या बाबतीत शासनाने आजवर कुठल्याही प्रकारचा दुजाभाव केलेला नसून फक्त अनुसूचित जमातीच्या लोकांवर ही दडपशाही का केली जात आहे. हाच एकमेव यक्षप्रश्‍न या लोकांना वारंवार सतावत आहे.

2 ऑक्टोबर गांधी पासून आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. केवळ आपल्या कष्टाचे पैसे आपल्या कुटुंबाला आधार म्हणून मिळावेत जेणेकरून उर्वरित आयुष्य मुलाबाळांच्या सोबत सुखसमाधान व्यथित करता येईल हे स्वप्न उराशी बाळगून सुध्दा या अंतिम स्वप्नांची राखरांगोळी करण्यात शासनाला धन्यता वाटत आहे. या उपोषणाला 12 दिवस पूर्ण होत आहेत. याचप्रकारे स्वतःवर बेतलेल्या प्रसंगाबाबतीत एका मयत पत्नीने आपली कैफियत मांडली आहे. त्यामुळे हृदयाला वेदना झाल्याशिवाय राहणार नाहीत.आफ्रोहचे उपोषणाच्या निमित्ताने मृत कर्मचारी मोहन टिक्कस यांच्या पत्नी अल्काने मांडली आपली व्यथा माडंली.

Exit mobile version