पी.एन.पी महाविद्यालयाकडून तिरंगा रॅली

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून शुक्रवारी (दि.14) 80व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सर्वप्रथम इतिहास विभागाचे प्रा. साईनाथ पाटील यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास सांगितला, त्यानंतर विद्यार्थ्यांनी तिरंगा हातात घेऊन रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. भारत माता की जय, वंदे मातरम अशा देशभक्तीपर घोषणा देऊन विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष साजरा केला. या कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन महाविद्यालयातील इतिहास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले होते. सदर तिरंगा रॅलीमध्ये महाविद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version