| मुंबई | वृत्तसंस्था |
मुंबईच्या अटल सागरी सेतूवरुन एका व्यक्तीची समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली आहे. न्हावा शेवा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा गुन्हा नोंद झालेली ही दुसरी घटना आहे. ही घटना सेतूवर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 20 मार्च रोजी एक महिला डॉक्टरने देखील अटल सेतूवरून आत्महत्या केली होती.
श्रीनिवास रात्री साडे अकराच्या सुमारास घराबाहेर पडले. मंगळवारी (दि. 24) दुपारी 12.30 वाजता चारचाकी गाडीतून श्रीनिवास अटल सेतूवर आले होते. सेतूवर येताच चारचाकी पार्क करून इकडे तिकडे न पाहता थेट सेतूवरुन खवळलेल्या समुद्रात उडी मारली. याआधीही कुवैतमध्ये काम करीत असतानाही त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. श्रीनिवास कुरुकुट्टी (38) असे आत्महत्या करणा-या व्यक्तीचे नाव आहे. नैराश्यातून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. श्रीनिवास काही दिवसांपूर्वी कुवैतहून भारतात आले होते. भारतात आल्यानंतर ते डोंबिवलीत वास्तव्यास होते. श्रीनिवास कुरुकुट्टी कुवैत येथील एका खासगी कंपनीत काम करत होते. इलेक्ट्रॉनिक इंजिनिअर म्हणून काम करत असलेल्या श्रीनिवास यांनी ऑक्टोबर 2023 मध्येच कुवैत येथील जॉब सोडून डोंबिवलीतच आपला स्वतःचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र व्यवसायात आलेल्या आर्थिक अडचणींमुळे श्रीनिवास वैफल्यग्रस्त झाले होते.







