ब्रिटिशकालीन धरणातील गाळ काढणार

। नेरळ । वार्ताहर ।
नेरळमधील ग्रामपंचायतच्या मालकीचे ब्रिटिशकालीन धरणात प्लास्टिक पिशव्या आणि पावसात वाहून आलेली माती यांचा मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे त्यामुळे धरणातील गाळ काढण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. दरम्यान, नेरळ ग्रामपंचायतीने धरणातील गाळ काढण्यासाठी धरणातील सर्व पाणी सोडून दिले असून लवकरच गाळ काढण्याच्या कमला सुरुवात होईल अशी माहिती नेरळ ग्रामपंचायतकडून देण्यात आली आहे.

ब्रिटिशकालीन धरण असून त्या धरणात नेरळ गावातील गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते. या धरणावर गणेश विसर्जन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होत असतो. या धरणात मोठ्या प्रमाणात निर्माल्य आणि कचरा देखील आणून टाकला जातो. त्यात माथेरानच्या डोंगरातील पाणी आणि पाण्यासोबत आलेले दगड हे धरणाच्या बंधामध्ये अडकून राहतात आणि धरणात पाण्यापेक्षा अधिक गाळ आणि इतर वस्तूंची गर्दी झालेली असते. त्यामुळे धरणात वर्षी मोठ्या प्रमाणात जलपर्णीचा विळखा देखील वाढला होता.त्यामुले धरणातील दूषित झालेले पाणी सोडून देण्याची मागणी करण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते संदीप उतेकर यांच्या मागणीनंतर नेरळ ग्रामपंचायत ने त्या धरणातिळ गाळ काढण्यासाठी सर्व पाणी सोडून दिले आहे.

आता धरणातील सर्व मातीचा गाळ तीव्र उन्हाळामुळे सुकून गेला आहे.त्यामुले धरणात जेसीबी मशीन घुसवून गाळ काढणे शक्य होणार आहे.त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतने त्या कामाची तरतूद केली असून धरणातील सर्व मातीचा गाळ आणि त्यातील प्लास्टिक यांचा कचरा काढण्यापूर्वी नेरळ ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकार्‍यांनी धरण परिसरात जाऊन पाहणी केली. त्यावेळी सरपंच उषा पारधी आणि उपसरपंच मंगेश म्हसकर यांनी पाहणीअंती धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेणार असल्याची मनहिति दिली आहे. दुसरीकडे या धरणातील खत म्हणून वापरता येईल अशी माती कोणत्याही शेतकर्‍याला न्यायाची असेल तर त्यांनी घेऊन जावी असे आवाहन नेरळ ग्रामपंचायतने केले आहे.

Exit mobile version