| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अधिकार आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विधी सेवा दिन तथा तंबाखू मुक्त युवा अभिमानाच्या निमित्ताने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले.
समाजातील सर्वसामान्यांपर्यंत न्याय हा अधिकार आहे, दान नाही. हा संदेश पोहोचवण्याबरोबरच तंबाखूजन्य व्यसनांपासून युवा पिढीला दूर ठेवण्याचे उद्दिष्ट या उपक्रमामागे ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश तेजस्विनी निराळे यांनी प्रास्ताविक करताना समाजातील गरजू दुर्बल वंचित घटकांना न्यायाच्या उपलब्ध बाबत जागृती निर्माण करण्याची गरज अधोरेखित केली. शिस्तबद्ध पद्धतीने रॅलीची सुरुवात करून हा संदेश अधिक प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे असे आवाहन त्यांनी केले. या रॅलीमध्ये जिल्हा न्यायालयातील न्यायाधीश अलिबाग वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रसाद पाटील, उपाध्यक्ष ए.डी. पाटील, सचिव ॲड. अमित देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील, दत्ता पाटील, लॉ कॉलेज, नर्सिंग कॉलेज, वकील वर्ग व न्यायालयीन कर्मचारी तसेच अलिबाग येथील जेएसएम कॉलेज, शासकीय मेडिकल कॉलेज आणि जनरल अरुण कुमार वैद्य हायस्कूल येथील 250 हून अधिक विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी कायदेविषयक व तंबाखू विरुद्ध घोषणाबाजी केली तसेच कायदेविषयक तंबाखूमुक्त समाजाबाबत जनजागृती करणारी फलके प्रदर्शित केली.







