। दिघी । वार्ताहर ।
श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूकीत विजय तोडणकर प्रणित पॅनलचा दणदणीत विजय झाला आहे. विजय तोडणकर दिवेआगर सहकार पॅनलने श्री सुवर्ण गणेश पॅनेलचा 9 विरूद्ध 2 ने धुव्वा उडवून पराभव केला आहे. सोसायटीची मुदत 2019 मध्ये संपली होती. त्यामुळे गेली 2 वर्षे ही निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलली जात होती. मात्र, झालेल्या निवडणूकीत तोडणकर पॅनेलने बाजी मारली आहे. विजय तोडणकर प्रणित दिवेआगर सहकार पॅनलचे सिया मुद्राळे, नेहा पाटील, कौशल वाणी, राजन रिळकर, संदेश गुरव, शेखर कोसबे, सुजित गुरव, योगेश पारकर, सौरभ तोडणकर व गजानन चोगले हे बिनविरोध निवडून आले तर श्री गणेश पॅनलचे वैभव पेनसे, किशोर पिळणकर हे निवडून आले.







