। पनवेल । वार्ताहर ।
रोडपाली येथील फुडलॅंड कंपनीसमोरील उड्डाणपुलावर भीषण अपघात झाला. भरधाव ट्रकने टोल वसूल करणा-या कर्मचा-याला धडक दिली. यात कर्मचारी गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधून सायंकाळच्या सूमारास कंपन्यांमधून एकाचवेळी सूटणा-या वाहनांमुळे रोडपाली येथील फुडलॅंड कंपनीसमोरील उड्डाणपुलावर कोंडी होते. शनिवारी (दि. 09) सायंकाळी साडेपाच वाजताच्या सूमारास संदीप मिश्रा (32) हे एका अवजड वाहनाकडील टोलची पावती तपासत होते. त्याचवेळी उड्डाणपुलावरुन आलेल्या भरधाव ट्रकने संदीपला धडक दिली. या धडकेमध्ये संदीप दोन्ही ट्रकच्या मधोमध चिरडले जाऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, या अपघातानंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
याप्रकरणी कळंबोली पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी सोमवारी ट्रकचालक बिलाल अहमद हजरत अली याला ताब्यात घेतले.