। पोलादपूर । प्रतिनिधी ।
महाड आणि पोलादपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या काही वर्षांपासून भूस्खलनाच्या घटना सातत्याने होत असताना, गेल्या वर्षी 2021मध्ये मोठ्या प्रमाणात मनुष्य व वित्तहानी झाल्याने सामाजिक क्षेत्रातून या घटनांची मोठ्या प्रमाणात मीमांसा सुरू झाली आहे. शनिवार, दि. 30 एप्रिल रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत माणगाव तालुक्यातील वडघर येथील साने गुरूजी स्मारकामध्ये भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी आणि अॅक्वाडॅम संस्थेतील त्यांचे सहकारी भूस्खलनाबाबत अहवालाची मांडणी करणार आहेत.
भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. हिमांशू कुलकर्णी यांनी गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम घाटातील भूस्खलनाचा सखोल अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल नुकताच महाराष्ट्र शासनासमोर सादर केला आहे. आता हा अहवाल