विश्वविजेतेपद कोण जिंकणार … तज्ञांचं मत जाणून घ्या

ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडमध्ये रंगणार तगडी लढत
। दुबई । वृत्तसंस्था ।
यंदाचा टी20 विश्‍वचषक आता अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे. उद्या अर्थात दि.14 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाणार आहे. संपूर्ण विश्‍वचषकात उत्तम कामगिरी करत न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया हे संघ फायनलपर्यंत पोहोचले आहेत. पहिल्या सेमीफायनल सामन्यात न्यूझीलंड संघाने इंग्लंडला मात देत अंतिम सामन्यात जागा मिळवली ज्यानंतर पाकिस्तानला मात देत ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आता हे दोघे एकमेंकाविरुद्ध भिडणार आहेत. वेगवेगळ्या ग्रुपमधून आलेले हे संघ यंदाच्या विश्‍वचषकात प्रथमच आमने-सामने येणार असून कोण यंदाची ट्रॉफी उचलेल, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. रविवारी होणा-या या सामन्याकडे किवी संघ इतिहास बदलू शकतो की नाही याकडे सार्‍या जगाचे लक्ष लागले आहे. वास्तविक, खउउ स्पर्धेच्या अंतिम फेरीत न्यूझीलंडचा सामना ऑस्ट्रेलियाशी होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी हे दोन्ही संघ 2009 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत आणि त्यानंतर 2015 मध्ये एकदिवसीय विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आमनेसामने आले होते, मात्र दोन्ही वेळा किवी संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते.
या दोन अंतिम सामन्यांशिवाय ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड याआधीही दोनदा आमने-सामने आले होते, पण त्यातही निकाल सारखाच लागला. 1996 च्या विश्‍वचषकातही न्यूझीलंड संघ ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झाला होता, तर 2006 साली चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही किवी संघाचा पराभव झाला होता.
आयसीसी स्पर्धेच्या बाद फेरीच्या सामन्यांमध्ये हे दोन्ही संघ आतापर्यंत चारवेळा भिडले आहेत आणि प्रत्येक वेळी किवी संघाला पराभव पत्करावा लागला आहे. 1996, 2006, 2009 आणि 2015 या वर्षानंतर पुन्हा एकदा 2021 मध्ये हे दोन्ही संघ एकमेकांशी भिडणार आहेत, त्यामुळे यावेळी न्यूझीलंड संघ इतिहास बदलू शकणार का, हा मोठा प्रश्‍न आहे.


प्रतीक्षा संपणार?
वन-डे वर्ल्ड कपमधील सर्वात यशस्वी ऑस्ट्रेलिया संघाला टी20 वर्ल्ड कपने वारंवार हुलकावणी दिली आहे. त्यामुळे उद्याच्या सामन्यात ही प्रतीक्षा संपवण्याच्या निर्धारानं आरोन फिंचची टीम उतरणार आहे. या टीममध्ये अनेक दिग्गज आणि मॅच विनर्स खेळाडूंचा समावेश आहे. पण प्रमुख खेळाडूंचा फॉर्म आणि कमी क्रिकेट ही कॅप्टन फिंच समोरची मोठी डोकेदुखी असणार आहे. ऑस्ट्रेलियाकडं आरोन फिंच आणि डेव्हिड वॉर्नर ही अनुभवी आणि आक्रमक ओपनिंग जोडी आहे. तर मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जोश हेजलवूड आणि केन विल्यमसन असा जोरदार फास्ट बॉलिंगचा अटॅक आहे. अ‍ॅस्टन अगर आणि अ‍ॅडम झम्पा हे दोन स्पिनर्स ऑस्ट्रेलियाकडं आहेत.

विजेतेपदाची हॅट्ट्रिक
आधी 2019 चा वर्ल्डकप, त्यानंतर जागतिक कसोटी अजिंक्यपदाचे जेतेपद पटकावित न्यूझीलंडने कर्णधार केन विल्यमसनच्या नेतृत्वात चांगली कामगिरी केली आहे. पहिल्यांदाच टी-20 विश्‍वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झालेला न्यूझीलंडचा संघ हे विजेतेपद पटकावून जागतिक विजेतेपदाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यासाठी सलामीवीर मार्टिन गुप्टील, कर्णधार केन विल्यमसन, जिमी निशम, गोलंदाज बोल्ट, टीम साऊदी यांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

Exit mobile version