महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी

| चिरनेर | वार्ताहर |

चिरनेर येथे संकष्टी चतुर्थी निमित्ताने सोमवारी हजारो भाविकांनी उन्हाची तमा न बाळगता प्राचीन जागृत श्री महागणपतीच्या दर्शनाचा लाभ घेतला. संकष्टीच्या आदल्या दिवशी म्हणजे रविवारी देखील चिरनेरच्या महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात गणेश भक्तांची रीघ लागली होती. पहाटे 4 वाजताच मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. यावेळी श्री महागणपतीचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. या श्रींच्या दर्शनासाठी मुंबई, नवी मुंबई, पुणे, ठाणे, डोंबिवली, कल्याण, उरण, पनवेल, पेण तसेच अन्य भागातून आलेल्या हजारो भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केली होती. गणेश भक्तांना रांगेत सुरळीत दर्शन व्हावे यासाठी चोख व्यवस्था करण्यात आली होती. भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील उत्तम करण्यात आली होती.

Exit mobile version