| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला आज पाच दिवस पूर्ण होत आहेत. दोन्ही बाजूंनी होत असलेल्या हल्ल्यांमुळे वातावरण आणखी चिघळले आहे. इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये इराणमध्ये किमान 224 लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यात तेहरानचे काही उच्च लष्करी कमांडर, अणुशास्त्रज्ञ आणि नागरिकांचा समावेश आहे.
इस्रायली अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या हद्दीत इराणी हल्ल्यात महिला आणि मुलांसह किमान 24 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायली सैन्याने मंगळवारी पहाटे इशारा दिला की, त्यांना इराणकडून सोडण्यात आलेले नवीन क्षेपणास्त्र आढळले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी तेहरानमधील अमेरिकन रहिवाशांना तेथून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. याचबरोबर, इराण हे युद्ध जिंकणार नसून त्यांनी यासाठी चर्चा करावी, असेही ट्रम्प म्हणाले आहेत.







