माथेरानमध्ये मशाल मिरवणूक

। नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान येथील हुतात्मे भाई कोतवाल आणि मानिवली येथील हुतात्मे हिराजी पाटील यांच्या 78व्या बलिदान दिनानिमित्त रविवारी माथेरान मध्ये भल्या पहाटे मशाल फेरी काढण्यात आली.या मशालफेरी नंतर दोन्ही हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. माथेरान गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीन हुतात्मा बलिदान निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पालिकेच्या माध्यमातून भल्या पहाटे मशाल फेरी काढण्यात आली,रेट्यात मावळत्या नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,मावळते उपनगराध्यक्ष अक्ष चौधरी यांच्यासह माथेरान पालिकेच्या मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांच्यासह माथेरान मधील सर्व पक्षांचे प्रमुख सहभागी झाले होते.


माथेरान मधील हुतात्मा भाई कोतवाल यांच्या स्मारकात भाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केल्यानंतर मशाल फेरीला सुरुवात झाली. तेथून महात्मा गांधी रस्त्याने ही मशाल फेरी माधवजी गार्डन येथे आली. तेथे हुतात्मा भाई कोतवाल यांच्या अर्ध पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.त्या ठिकाणी अभिवादन सभा झाली,त्यावेळी माजी माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी,मनोज खेडकर,अजय सावंत,पालिकेचे मावळते गटनेते प्रसाद सावंत,तसेच वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश जाधव,राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजेश दळवी,आरपीआयचे शहर अध्यक्ष अनिल गायकवाड,स्वातंत्र्यसैनिक यांचे नातेवाईक गिरीश पवार तसेच मावळते नगरसेवक आणि नागरिक पस्थित होते.

Exit mobile version