| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील हुतात्मा वीर भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या 83 व्या बलिदान दिनानिमित्त कर्जतमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हुतात्मा स्मृती समितीच्यावतीने कर्जत शहरात मशाल मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कर्जतच्या टिळक चौकात हुतात्मा बलिदान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांच्या हस्ते क्रांतीज्योत प्रज्वलित करण्यात आली. माजी नगराध्यक्ष राजेश लाड व नगरसेवक संतोष पाटील यांच्या हस्ते हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच, सिद्धगडहून आणलेल्या मृतिकेचे पूजन डॉ. रवींद्र मर्दाने यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी नगरसेवक अशोक राऊत, मानसी कानिटकर, सुचिता खोत, ॲड. योगिनी देशमुख, अरुण थोरवे, प्रभाकर आसवले आदी उपस्थित होते. त्यानंतर शहरातून मशाल मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक टिळक चौकात आल्यानंतर एका विशेष समारंभात शवम ढाकवळ आणि सृष्टी ढाकवळ यांनी दोन्ही हुतात्म्यांच्या कार्याची व बलिदानाची प्रसंगानुरूप माहिती सांगितली. यावेळी दत्तात्रेय म्हसे, विवेक बडेकर, रमेश पवार, पियुष पाटील, गजानन बोराडे, जयेश शेलार, कृष्णा पवार, शशिकांत मंडलिक, ॲड. भारती ढाकवळ, राहुल गायकवाड, विशाल कोकरे, निखिल क्षीरसागर, गणेश गायकवाड, मच्छिन्द्र पवार, संतोष मंडलिक, दिनेश पवार, संतोष पवार, सुनील आढाव, दिनेश पवार, स्नेहा आढाव, कल्पना मंडलिक, स्वरूपा मंडलिक, कविता शिंदे, विनायक पवार आदींसह कर्जतकर मोठ्या संखेने उपस्थित होते.







