फणसाड अभयारण्यात पर्यटन वाढणार

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुंबईपासून 154 किमी अंतरावर पनवेल-पेण-अलिबाग मार्गावर 52 चौरस कि.मी. क्षेत्रावर विस्तारलेल्या या अभयारण्याला जणु निसर्गाचा वरदहस्तच लाभलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मफणसाड अभयारण्याचे क्षेत्र मुरुड जंजिरा संस्थानाचे सर्वेसर्वा नवाब सिद्दी यांचे राखीव शिकार क्षेत्र होते. येथील जैवविविधतेचे संरक्षण व्हावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने 25 फेब्रुवारी 1986 मध्ये फणसाड वन्यजीव अभयारण्य घोषित केले.

भारतातून हजारो पर्यटक फणसाडला भेट देतात. घनदाट झाडी असल्याने पाऊसाचे प्रमाण खूप आहे. उंचावर असल्याने पाऊसात धुक्यासारखे वातावरण असते. शेकडो पाणवठे पाऊसच्या पाण्यानी भरून जातात, प्राणी जलक्रीडा करण्यासाठी पाणवट्यावर येतात. फणसाड धरण फुल्ल भरून त्याच्या वाहून जाणाऱ्या पाण्याचा आनंद घेण्यासाठी हजारो पर्यटक बोर्लीमांडला मार्गे भोईघर गावात येतात. गावातून धारण 10 मिनिटावर असल्याने गावाला पर्यटन व्यवसाय मिळतो ,फणसाड धबधब्याला हिरावयगर भात शेतातून जाण्याचा आनंद काही वेगळाच असतो.

फणसाडमध्ये नदीकाठची वने अशा या वैविध्यपूर्ण जंगलात सुमारे 718प्रकारचे वृक्ष, 17 प्रकारचे सस्तन प्राणी, 164 प्रकारचे रंगीबेरंगी पक्षी, 27 प्रकारचे साप व अनेक वन्य श्वापदे आढळतात. फणसाड अभयारण्यात साग व निलगिरीची रोपवने यासह प्रामुख्याने एैन, किंजळ, जांभूळ, द्वेद, कुडा, गेळा, अंजनी, कांचन, सावर, अर्जुन हे वृक्ष व कर्करोगावर गुणकारक नरक्या याबरोबरच सीताअशोक, सर्पगंधा, कुरडु, रानतुळस, कढीपत्ता उक्षी या औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळून येतात. वाकेरी, वाघाटी, पळसवेल, पेंटगुळ इत्यादी प्रकारच्या वेली व जगातील सर्वात लांब वेलींपैकी एक असलेली गारंबीच फणसाड वन्यजीव अभयारण्यात 17 प्रकारचे वन्यप्राणी आहेत. यामध्ये रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, सांळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, वानर, माकड, रानमांजर व बिबट्या आणि पर्यटकांच्या व अभ्यासकांचे आकर्षण असलेले शेकरू येथे हमखास दृष्टीस पडते.

Exit mobile version