। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील इमॅजिका याठिकाणी फिरण्यासाठी आलेल्या एका पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही शुक्रवारी (दि.10) दुपारी चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर कुळगाव येथील रहिवासी कपिल शांताराम पाटील (47), हे शुक्रवारी आपल्या कार्यालयातील सहकाऱ्यांसोबत इमॅजिकामध्ये सहलीसाठी आले होते. दरम्यान, त्यांना अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले. उपस्थितांनी तातडीने मदतीचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
इमॅजिका येथे पर्यटकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
