तुटलेल्या फळ्यांवरून पडून पर्यटक जखमी

। श्रीवर्धन । वार्ताहर ।

2014 च्या सुमारास श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यावरती सुशोभित असा धुप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात आलेला आहे. तत्कालीन आ. सुनील तटकरे हे राज्याचे अर्थमंत्री असताना केंद्र शासनाकडून आलेल्या पर्यटन विकास निधीमधून सदरचा बंधारा बांधण्यात आलेला आहे. परंतु आता आठ-नऊ वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर या फळ्या कुजून गळून पडल्या आहेत. बुधावार (21) सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळेस एक पर्यटक या सुशोभीकरण केलेल्या बंधार्‍यावरून फेरफटका मारत असताना तुटलेल्या फळ्यांवरून थेट खाली पडला. यामध्ये पर्यटक जखमी झाला आहे. सदर सुशोभीकरण केलेल्या बंधार्‍याची डागडुजी करणे आवश्यक असून सदर लाकडी फळ्या काढून त्या ठिकाणी कॉन्क्रीट टाकणे आवश्यक आहे. बंधार्‍यावरती जीव रक्षकांना बसण्यासाठी व त्यांचे सामान ठेवण्यासाठी बांधलेली शेड सुद्धा पूर्णपणे सडून जाऊन त्याचे पत्रे उडून गेल्याने जीव रक्षकांना बसण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळत आहे. तरी नगरपरिषदेने बंधार्‍याच्या दुरुस्तीचे व देखभालीचे काम तातडीने सुरू करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Exit mobile version