माथेरानची राणी सुसाट

पर्यटकांचा तुफान प्रतिसाद, 64 लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल जमा
| माथेरान । वार्ताहर ।
पर्यटकांचे खास आकर्षण असणारी माथेरानची राणी असलेली मिनीट्रेनला पर्यटकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. गेल्या सहा महिन्यात माथेरानचा राणीची 53 हजारपेक्षा जास्त तिकिट विक्री केली आहेत. त्यामधून 64 लाख रुपयांपेक्षा जास्त महसूल मध्य रेल्वेने गोळा केला आहेत.माथेरान हे मुंबईतील नागरिकांसाठी सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. मध्य रेल्वेने नेरळ आणि माथेरान दरम्यान प्रवाशांसाठी रेल्वेची शटल सेवेसह हे ठिकाण एक प्रमुख पर्यटन स्थळ म्हणून लोकप्रिय करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन 22 ऑक्टोबर 2022 रोजी पुन्हा सुरू झाली.तेव्हापासून निसर्गाचा आनंद लुटण्याचा आनंद देणार्या मिनी ट्रेनमधून प्रवासी या छोट्याशा हिल स्टेशनवर दाखल झाले आहेत. ऑक्टोबर 2022 ते 23 मार्च 2023 पर्यत मिनी ट्रेनच्या 53 हजार 470 तिकीट विक्री झाली आहे. यातून मध्य रेल्वेला 64 लाख 99 हजार 91 रुपयांचा महसूल गोळा केला आहेत.

100 वर्षांची जुनी ट्रेन
मुंबई, पुणे आणि परिसरातील नागरिकांसाठी माथेरान हे सर्वात जवळचे आणि सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. नेरळ-माथेरान टॉय ट्रेन, जी 100 वर्षांहून अधिक जुनी आहे, ही भारतातील काही पर्वतीय रेल्वेंपैकी एक आहे.वर्ष 2019 मध्ये मुसळधार पावसामुळे वाहून गेलेला नेरळ-माथेरान ट्रॅक पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेने जोरदार प्रयत्न केले आहेत. नेरळ ते अमन लॉजपर्यंत पर्वतांना वळसा घालणारी नॅरोगेज लाईन अखेर तयार झाली आणि या मार्गावरील सेवा 22 ऑक्टोबर 2022 रोजी पुन्हा सुरू करण्यात आली.

Exit mobile version