। अलिबाग । प्रतिनिधी ।
वरसोली येथे फिरण्यास आलेल्या पर्यटक महिलेचा विनयभंग करण्यात आला. बाथरुममधील सोफकेसमध्ये छुपा कॅमेरा आरोपीने लपविला होता. याप्रकरणी आरोपीविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वरसोली येथील स्पाईसलॅन्ड हॉटेलजवळील बंगल्यामध्ये घडली आहे.
ठाणे येथील पर्यटक महिला तिच्या कुटुंबियांसमवेत (दि.28) मे रोजी फिरण्यास आली होती. वरसोलीमधील स्पाईस लँन्डच्या पुढील बंगल्यामध्ये ही मंडळी वास्तव्यास होती. दरम्यान, आरोपीने त्या बंगल्यातील बाथरुममधील सोफकेसमध्ये एक छुपा कॅमेरा लपवून ठेवला होता. ही बाब महिलेच्या लक्षात आल्यावर तिने अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये श्रीपाद म्हात्रे याच्याविरोधात तक्रार केली. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास महिला पोलीस हवालदार मयुरी जाधव करीत आहेत.