| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग समुद्रकिनारी फिरण्यास आलेल्या मित्र मैत्रिणीची बॅग लंपास करण्यात आली. त्यातील मोबाईलही गायब झाले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील येरवडामधील डेक्कन कॉलेजमधील मित्र मैत्रिणी अलिबागला फिरण्यासाठी आले होते. बुधवारी दुपारी अलिबाग समुद्रकिनारी सर्वजण पर्यटनाचा आनंद लुटत होते. दरम्यान त्यांनी एका बॅगेत मोबाईल ठेवून ती बॅग किनारी ठेवली होती. या संधीचा फायदा घेत चोरट्याने ती बॅग लंपास केली. मोबाईलसह एकूण 72 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार अलिबाग पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.






