किल्ले रायगडावर पर्यटकांना बंदी

महाड | प्रतिनिधी |

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून आदेश जारी करत पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. किल्ले रायगडावर पुढील आदेशापर्यंत पर्यटकांना पुरातत्त्व विभागाने बंदी घातली आहे. महाराष्ट्रात कोरोना आणि ओमिक्रॉनबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रायगडवर पर्यटकांची गर्दी होत असल्यामुळे पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध जारी केले आहेत. तसेच पर्यटन स्थळांवरही राज्य सरकारने बंदी आणली आहे. 

रायगडपाठोपाठ कर्नाळा अभायारण्यसुद्धा पर्यटकांसाठी तुर्तास बंद कऱण्याचे आदेश दिले आहेत. जिथे जिथे गर्दी होण्याची शक्यता आहे तिकडे पर्यटकांना बंदी असेल. तसेच गेल्या काही दिवसांपासून रायगड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

जंजिराचे दरवाजे पुन्हा बंद
मुरुड तालुक्यात कोरोना रुग्णाची संख्या अति अल्प असली तरी जंजिरा किल्ला बंद केल्याने मुरुडच्या पर्यटन पुन्हाएकदा अडचणीत आले .आधीच 2 वर्षांपासून हॉटेल व्यवसाय मंदीत होता.मार्चपासून जरा कुठे चांगली सुरुवात झाली होती .पर्यटन स्थिर होत होते त्यात पुन्हा कोरोनाची संख्या वाढीमुळे जंजिरा बंद झाला .जंजिरा बंद म्हणजे पर्यटक खूप कालावधीसाठी मुरुडपासून लांब जातो याचा अनुभव सर्वच मुरुडकरांनी घेतला आहे.

Exit mobile version