पोलिसांच्या नियोजनामुळे पर्यटक; सुरक्षीत जिल्हा पोलिस अधीक्षकांचे मार्गदर्शन

वर्षभरात कोणतेही वाईट दुर्घटना नाही

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरुड तालुका पर्यटन स्थळ असल्याने देश-विदेशातुन लाखो पर्यटक फिरण्यासाठी ये-जा करिता असतात. परंतु काही पर्यटकांच्या आततायीपणामुळे काशिद, चिकनी, मुरुड समुद्रात पोहत असताना आतापर्यंत 142 पेक्षा जास्त पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. यामध्ये विद्यार्थ्यांचा जास्त समावेश आहे. त्यानंतर पर्यटकांची सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला होता. पर्यटकांची संख्या वाढवावी व पर्यटकांचा प्रवास सुखाचा व्हावा याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक-सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मुरुड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक -प्रकाश सकपाळ व सागर रसाळ यांनी काशिद समुद्राकिनारी पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अनेक उपाययोजना केल्या. याला पर्यटकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने वर्षभरात कोणतेही वाईट दुर्घटना घडली नाही यामुळे आज पर्यटक सुरक्षीत राहिला आहे.

जगाच्या नकाशावर नावा रुपाला आलेला काशिद समुद्रकिनाऱ्यावर येणारे काही पर्यटक बिनधास्तपणे समुद्राचा पाण्याचा अंदाज व भरती ओहोटीची वेळ न पाहता पाण्यात पोहण्यासाठी उतरतात. आणि वाईट दुर्घटना घडतात अशा पुन्हा वाईट दुर्घटना घडु नये यासाठी पोलीस निरीक्षक -प्रकाश सकपाळ यांनी रोज दोन पोलीस शिपाई या ठिकाणी तैनात केले आहेत. तसेच येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करुन काशिद समुद्राची नैसर्गिक रचना कशी आहे त्याची संपूर्ण माहिती दिली जाते. पर्यटकांनी आतातयीपण करु नये स्व:ताची व आपल्या परिवाराची काळजी घेऊन समुद्रकिनारावर आनंद घ्या खवळलेल्या समुद्रात पोहायला उतरु नका हा समुद्र पोहण्यासाठी धोकादायक आहे. जर कोणी ऐकत नसेल समुद्रात पोहण्यासाठी उतरत असेल तर लाईफ जॅकेट घालून व जीव रक्षकांना सांगुन व पाण्याचा अंदाज घेऊन पोहायला उतरा. आणि स्वताची काळजी घ्या असे आवाहन प्रकाश सकपाळ व ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे. पावसाळा असल्याने समुद्र खवळलेला असतो कोणतेही वाईट घटना घडु नये यासाठी पर्यटकांना याठिकाणी मनाई केली जाते. याठिकाणी असणारे सर्व स्टॉल बंद ठेवण्यात येते. तरी पण पर्यटक समुद्राकिनारा येणाचा प्रयत्न करत असतात. परंतु पोलिस शिपाईचा बंदोबस्त असल्याने काशिद समुद्राकिनारा सुरक्षित आहे. काही पर्यटक काशिद समुद्राकिनारी येण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु पोलिसांच्या संतर्कमुळे पर्यटकांना समुद्राकिनाऱ्यापासून लांब राहावे लागत आसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत असला तरी त्यांच्या सुरक्षेतेची जबाबदारी आमची आहे, अशी प्रतिक्रिया मुरुड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निशा जाधव यांनी केली.

Exit mobile version