जलदुर्ग खांदेरी सहलीचा घेतला पर्यटकांनी आनंद

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील निसर्ग सुंदर थळ सामाजिक संस्थेच्या वतीने जलदुर्ग खांदेरी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीचा आनंद पर्यटकांनी मनमुरादपणे लुटला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या आरमाराचे प्रमुख केंद्र असलेल्या थळ गावाच्या पर्यटन व्यवसायाला चालना मिळावी, महाराजांनी बांधलेल्या खुबलढा, खांदेरी आणि उंदेरी आदी किल्ल्यांचा इतिहास नागरिरकांपर्यंत पोहोचविण्यासाठी रविवार (दि. 7) जानेवारीला निसर्ग सुंदर थळ सामाजिक संस्थेने जलदुर्ग खांदेरी सहलीचे आयोजन केले होते. यामध्ये शंभरहून अधिक पर्यटकांनी सहभाग घेतला. योगेश घरत, अध्यक्ष अवधूत सप्रे आणि डॉ. राजाराम हुलवान यांच्या पुढाकाराने राबविलेल्या या उपक्रमातून खांदेरी, किल्ल्याचा इतिहास पर्यटकांनी सहलीच्या माध्यमातून जाणून घेतला. निसर्गरम्य अशी ऐतिहासिक स्थळे पहाण्याचा व प्रत्यक्षात अनुभवण्याचा आनंद त्यांनी लुटला.

Exit mobile version