समुद्र किनार्‍यावर पर्यटकांचा शुकशुकाट

स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम
धंदा बुडाल्याने व्यावसायिक हवालदिल

| मुरूड जंजिरा । वार्ताहर ।

अरबी समुद्रातील वादळी पाऊस गेल्या आठवड्यापासून थांबला असून पर्यटनासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुरूड तालुक्यातील समुद्र किनार्‍यावरील पर्यटन स्पॉटवर पर्यटकांची मोठी वर्दळ सूरु होईल असा अंदाज व्यावसायिकांना होता; परंतू तो फोल ठरला आहे. तालुक्यातील सर्वच समुद्रकिनार्‍यावर पर्यटकांचा शुकशुकाट दिसत आहे. पर्यटकांनी पाठ फिरवल्याने मुरूड, नांदगाव, काशीद, बारशिव, आगरदांडा, खोरा जेट्टी, राजपूरी जेट्टी वर पर्यटक नसल्याने व्यावसायिकांना नुकसानीचा धक्का बसला आहे. गजबजलेल्या समुद्रकिनारी मोजमीच वाहने आणि पर्यटक दिसून येत आहे. निव्वळ पर्यटन व्यवसायावर अवलंबित व्यावसायिक हवालदिल झाले आहेत.

Exit mobile version