| मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील बेलापूरजवळ असलेल्या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेले चाळीस ते पन्नास पर्यटक अडकले आहेत. पाण्याच्या प्रवाह वाढल्यामुळे त्यांना येण्यासाठी वाट मिळत नाही. या पर्यटकांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलासह पोलिस दल आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
नवी मुंबईतील बेलापूरजवळ आर्टिस्ट कॉलनीच्या मागील बाजूस असणाऱ्या डोंगरात धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी गेलेले 40 ते 50 पर्यटक अडकले आहेत. मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह वाढल्याने पर्यटक अडकले. अग्निशमन दलाचे जवान आणि नवी मुंबई पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याशिवाय सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मदत होत आहे. दोरखंडाच्या सहाय्याने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. मदतकार्य वेगाने सुरु असून सायंकाळपर्यंत सर्वांना रेस्क्यू करण्यात येईल, अशी माहिती आहे. दुसरीकडे मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे हवेतील दृश्यमानतेवर परिणामझाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. रविवारी मेगाब्लॉक असल्याने जलद मर्गावरील वाहतूकसुद्धा धीम्या मार्गावर वळविण्यात आली आहे.