काशीद येथे विजेच्या अनियमितेमुळे पर्यटक हैराण

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील काशीद हे आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ असूनसुद्धा येथे विजेच्या अनियमितेमुळे असंख्य पर्यटकांना शनिवार व रविवारी मोठा त्रास सहन करावा लागला आहे. सर्वाधिक पर्यटक काशीद समुद्रकिनारी येत असतात. अशा विशेष पर्यटन स्थळी विजेच्या सारख्या जाण्यामुळे स्थानिक नागरिकांसह असंख्य पर्यटक त्रस्त झाले आहेत. शनिवार व रविवारी हजारो पर्यटक येथे डेरेदाखल झाले आहेत. परंतु, या वाढलेल्या पर्यटकांना पुरेसा वीजपुरवठा न झाल्याने मोठी समस्या उद्भवली असून, ग्रामस्थांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काशीद या ठिकाणी मोबाईल रेंज सुद्धा मिळत नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.काशीद हे आंतराष्ट्रीय पर्यटन स्थळ असताना देखील येथे वीज व मोबाईल रेंज चा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.वास्तविक पहाता काशीद येथून वीज महावितरण कंपनीस सर्वाधिक मोठा महसूल मिळत असताना सुद्धा विजेच्या अनियमितेकडे दुर्लक्ष्य होत असल्याबाबत स्थानिक लोक संताप व्यक्त करीत आहेत.वीज महावितरण कडून ट्रान्स्फार्मर ची समस्या असल्याने हि समस्या उध्दभवल्याचे लोकांना सांगण्यात येत आहे.जर ट्रान्स्फार्मर खराब झाला असेल तर तो त्वरित नवीन बसवावा अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.तसेच मोबाईल रेंज कमी असल्यामुळे येथील हॉटेल धारकांना पेयमेन्ट करताना मोठी समस्या सुद्धा येत होती.शुक्रवारी वीज सायंकाळी पाच वाजता गेली ती रात्री 12 नंतर आल्याने लोकांना पर्यटकांना सुविधा पोहचवताना मोठ्या समस्येशी तोंड द्यावे लागले होते. काशीद येथे कायमस्वरूपी वायरमन खूप आवश्यक आहे यासाठी महावितरने आम्हाला सदरचे पद उपलब्ध करून देण्याची मागणी सुद्धा काशीद ग्रामस्थांनी केली आहे.

Exit mobile version