| खोपोली | प्रतिनिधी |
खोपोली येथील झेनिथ धबधबा पाहण्यासाठी गेलेले तामिळनाडूतील 15 पर्यटक अडकले. त्यांना बाहेर काढण्यात पोलिसांना आणि अग्निशमन दलाला यश आले आहे.
खोपोलीजवळील प्रसिद्ध झेनिथ धबधबा पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेलेला असतो. मात्र, रविवारी सकाळी पावसाचा जोर वाढल्याने अचानक धबधब्याच्या प्रवाहात वाढ झाली. त्याचा अंदाज न आल्याने 15 पर्यटक धबधब्याच्या तीव्र प्रवाहात अडकले. या घटनेची माहिती खोपोली पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खोपोली नगरपालिकेचे अग्निशमन दल आणि स्थानिक हेल्प फाउंडेशनच्या बचाव पथकाने तत्परतेने मदतकार्य सुरू केले. तब्बल काही तासांच्या प्रयत्नानंतर सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका करण्यात यश आले. यातील 4 पर्यटक हे तमिळनाडू मधील असल्याचे समोर आले आहे. तर खोपोलीत अडकलेल्या 15 पर्यटकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी हेल्फ फाऊंडेशनचे गुरुनाथ साठेलकर, अमोल कदम, सौरभ घरत, फरहान कर्जीकर, प्रतीक घरत तसेच खोपोली पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे, पोलीस कर्मचारी अमोल धायगुडे, विकास पाटील आणि खोपोली फायर ब्रिगेडची टीमनी मेहनत घेत सर्व पर्यटकांना बाहेर काढले.





