नेहुली येथे स्पर्धा; आ. जयंत पाटील यांची उपस्थिती

। अलिबाग । प्रतिनिधी ।

नेहुली येथील श्री. बहिरेश्‍वर मित्रमंडळ व शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत कुस्त्यांचे जंगी सामने गुरुवारी (दि.8) मराठी शाळा मैदान, नेहुली येथे आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. पंडित पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस अ‍ॅड. आस्वाद पाटील, महिला आघाडीप्रमुख चित्रलेखा पाटील, तालुका चिटणीस अनिल पाटील, जि.प. माजी सदस्य संजय पाटील, माजी उपसभापती सुरेश पाटील, चेंढरे ग्रा.पं. सदस्य अजित माळी, खंडाळे सरपंच रंजना नाईक, उपसरपंच अशोक थळे, सदस्य नरेश गोंधळी, संतोष कनगुटकर, विनोद पाटील, कमलाकर म्हात्रे, रोहन चिमणे, जयेंद्र भगत, ॠषिकांत भगत, विलास वालेकर, खंडाळे हायस्कूल सभापती नाशिकेत कावज आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी, कुस्तीप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बहिरेश्‍वर मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, उपाध्यक्ष किरण पाटील, आखाडा प्रमुख बबन पाटील यांनी केले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे सदस्य मेहनत घेत आहेत.

Exit mobile version