मुरूड परिसरात पारंपरिक भात लावणी सुरू

| मुरूड जंजिरा | प्रकाश सद्रे |
मुरूड तालुक्यात अजूनही यांत्रिक पद्धतीने भात शेती ठराविक ठिकाणीच केली जाते.मोठ्या प्रमाणावर तालुक्यातील ग्रामीण भागात अजूनही बैल- नांगर आणि मनुष्य बळ घेऊनच भात शेती केली जाते असे वाणदे या गावी दिसून आले.

पावसाने उघडीप दिल्याने बुधवारी सकाळ पासून वाणदे जवळ शेतकरी बांधव भात लावणी करताना दिसत होते.आपल्या कडे जमीन क्षेत्र कमी असल्याने पारंपरिक शेती करणे परवडते अशी माहिती काही शेतकर्‍यांनी दिली. सध्या शेत जमिनीत लावणी योग्य पाणी असल्याने भात लावणी वेगाने हाती घेतल्याची माहिती शेतकरी बांधवांनी दिली.मात्र येथे कालवे नसल्याने पावसावरच शेती अवलंबून आहे.

Exit mobile version