महामार्गावर गर्डर बसवण्यासाठी पुन्हा वाहतुक बंदी

| कोलाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 वरील मुंबई गोवा वाहिनीवर मे. कल्याण टोल इन्फा.प्रा.लि.कंपनीतर्फे कोलाड पुई येथील म्हैसदरा नवीन पुलावर गर्डर बसविण्याचे काम पुन्हा एकदा करण्यात येणार आहे.

गुरुवार 18 जुलै 2024 ते शुक्रवार 19 जुलै 2024 पर्यंत दुपारी 12 ते दुपारी 4 या दरम्यान सलग चार तास वाहतूकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिक्षक (मुख्यालय) अरविंद साळवे यांनी दिली.

मे. कल्याण टोल इन्फा.प्रा. लिमिटेड कंपनीतर्फे करण्यात येणार्‍या नियोजित कामाच्यावेळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गांवर सर्व प्रकारची (हलकी व जड अवघड वाहने) यांची वाहतूक बंद करण्यात येणार आहे. दरम्यान, या महामार्गांवर वाहतूककोंडी होऊ नये, वाहन चालकांची गैरसोय तथा वाहतूक सुरळीत व सुनिश्‍चित राहणे आम जनतेच्या सोईसाठी आवश्यक आहे.

सर्व प्रकारच्या वाहनांची वाहतूक बंद करून जनतेला वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग वापरण्याबाबत अधिसूचना जारी करीत आहोत, असे साळवे यांनी सांगितले. वाहतूक मुंबई-गोवा महामार्ग 66 वरून मुंबई ते गोवा वाहिनीवर (मुंबईकडून गोव्याकडे) जाणारी हलकी वाहने व बसेस या वाकण फाटा येथून भिसे खिंड रोहा कोलाडवरून जाईल, तर खोपोली-पाली-वाकण राष्ट्रीय महामार्ग 66 वरून पालीमार्गी रवाळजे, निजामपूर, माणगाव या पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याची माहिती कोलाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते यांनी दिली आहे.

Exit mobile version