| कोलाड | प्रतिनिधी |
गेली दोन दिवस पावसाचा जोर कायम असल्याने मुंबई-गोवा महामार्गावर ठिकठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे माणगाव येथील कलमजेजवळील पुलावरून पाणी जात असल्याने तसेच गेली तीन-चार दिवस सततच्या पावसामुळे त्यावरून पाणी वाहून गेल्याने पुलाला काही थोडेसे तडे गेल्याची माहिती सदरील खात्याला मिळाली असून, मार्गावरील वाहतूक कोलाड आंबेवाडी नाका येथील भिरा फाट्यावरून ही माणगाव महाडकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली आहे.
मंगळवारी पहाटे धो -धो मुसळधार पावसामुळे मार्गावरील माणगावनजीकच्या कलमजे गावाजवळील पूल पाण्याखाली गेल्याने मंगळवारी सकाळपासून माणगाव, महाड, पोलादपूर तसेच तळकोकणात जाणारी वाहतूक वाहतूक यंत्रणा तसेच स्थानिक पोलीस अधिकारी यांच्यावतीने ही कोलाड येथून भिरा फाटा सुतारवाडी, विले व जावठा, निजामपूरमार्गे माणगावकडे वळविण्यात आली आहे.







