आंबेवाडी बाजारपेठेत वाहतूक कोंडी

| कोलाड | प्रतिनिधी |

शुक्रवार, शनिवार व रविवार अशा सलग तीन दिवस सुट्ट्या असल्यामुळे असंख्य पर्यटक तसेच कोकणवाशी मुंबई-गोवा महामार्गावरुन कोकणात दाखल झाले होते. परंतु, परतीच्या प्रवासात आंबेवाडी नाका येथील चौपदरी करणाच्या अपूर्ण कामामुळे येथे प्रवाशी वर्गाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. रविवार (दि.5) आंबेवाडी येथील आठवडा बाजाराचा दिवस असल्यामुळे तसेच महामार्गाच्या अपूर्ण कामामुळे रात्री उशीरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे हा वाहतूक कोंडीचा तिढा केव्हा सुटणार? असा सवाल प्रवाशी वर्गातून व्यक्त करण्यात आला असुन वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी कोलाड पोलिसांकडून शर्थिचे प्रयत्न केले.

Exit mobile version