वाहतूक शाखेचा रिक्षाचालकांवर कारवाई

। पनवेल । वार्ताहर ।

खारघरमधील बेशिस्त रिक्षांबाबत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत होत्या. त्या अनुषंगाने वाहतूक शाखेने 14 बेशिस्त रिक्षांवर व भाडे नाकारणार्‍या 03 अशा एकूण 17 रिक्षांवर कारवाई केली आहे. यापैकी भाडे नाकारणार्‍या तीन रिक्षा चालकांकडे डमी पॅसेंजर पाठवून भाडे नाकारले. म्हणून तीन रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच वाहतुकीस अडथळा होईल अशा लावलेल्या रिक्षा, तीन पेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणे, विना युनिफॉर्म रिक्षा चालक, भाडे नाकारणार्‍या रिक्षा या व इतर हेड खाली सन 2023 मध्ये 842 रिक्षांवर व सन 2024 रोजी आज पर्यंत 404 रिक्षांवर कारवाई केल्या. यापुढेही अशा बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे व.पो.नि संतोष काने यानी यावेळी सांगितले.

Exit mobile version